기술
मराठी शुद्धलेखन ह्या विषयावर हा पहिला मराठी मोबाइल ॲप देताना फार आनंद होत आहे.
र्हस्व किंवा दीर्घ; विसर्ग असणे किंवा नसणे; स्र किंवा स्त्र त्याचप्रमाणे लेखनसाम्य असले, तरी अर्थभिन्नता असणे; योग्य पर्यायी लेखन असणे; अशा अनेक प्रकारच्या शब्दांसाठी
ह्या ॲपमध्ये तर्हेतर्हेचे ठळक निर्देश दाखवले आहेत. मूळ रूपाला विकार होताना बदलणारे र्हस्व-दीर्घ दाखवले आहेत.
काही शब्दांमध्ये लागोपाठ येणार्या विशिष्ट व्यंजनांचा उच्चार करताना तो उच्चार शब्दात त्या व्यंजनांचे जणू काही जोडाक्षर असल्याप्रमाणे होणे (सुसकारा, सरदी), शब्दात
प्रत्यक्षात नसलेले द्वित्व किंवा नसलेला विसर्ग उच्चारात ऐकायला येणे (काव्य, हत्या, अंधकार, घनश्याम), शब्दात नसलेल्या वर्णाचा उच्चार ऐकायला येणे (संरक्षण, सिंह), शब्दात
असलेल्या उकाराचा उच्चारात लोप होणे (सुरुवात, गुरुवार), शब्दात नसलेला औ-कार उच्चारात ऐकायला येणे (लवकर); ह्या सर्व प्रक्रिया अनेक भाषांच्या बाबतीत सहज घडणार्या आहेत. अशा
सर्व प्रक्रियांमुळे आणि एकंदरीत भाषाशास्त्रानुसार योग्य आणि अयोग्य शब्दांचे लेखन ह्या ॲपमध्ये दाखवले आहे.
‘कोशात वापरलेल्या संक्षेपांचे आणि खुणांचे अर्थ’ आणि ‘कोश कसा पाहावा’ ह्या दोन गोष्टी वापरकर्त्यांनी नीट पाहून घेतल्या, तर ह्या ॲपचा वापर करणे सहजसुलभ होईल.
तुम्हांला हवा असलेला शब्द शोधण्यासाठी वर्णमाला किंवा बाराखडी पाठ असणे गरजेचे नाही. वरच्या पट्टीत तुम्ही तुमचा शब्द लिहायला सुरुवात करताच त्यानुसार खाली त्या अनुषंगाने शब्द
यायला सुरुवात होईल आणि काही सेकंदांतच तुमचा शब्द योग्य-अयोग्य लेखन, सामान्यरूपे, असल्यास इतर काही टीप, अर्थभेद, स्पष्टीकरण अशा आवश्यक त्या बाबींसह समोर येईल. ॲपने दाखवलेले
योग्य-अयोग्य लेखनाबद्दल तुम्हांला काही शंका असेल, तर शेजारी ‘स्पष्टीकरण’ ह्या दुव्यावर जाऊन तुम्ही त्या शब्दाच्या योग्य लेखनाचे शास्त्रीय स्पष्टीकरण पाहू शकता. शेकडो
शब्दांची अशी स्पष्टीकरणे दिली आहेत.
हा ॲप तुम्हांला कसा वाटला हे जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत.
ह्या आवृत्तीमध्ये सुमारे ११००० शब्द आहेत.

이전 버전
- 앱 이름: शुद्धलेखन ठेवा खिशात (Shuddhalekhan Theva Khishat)
- 종류: 교육
- 앱코드: com.mitpl.shuddhalekhan
- 버전: 1.0.1
- 요구 사항: 3.0.x이상
- 파일 크기 : 3.45 MB
- 업데이트: 2017-11-04